या शेतकऱ्यांना मिळणार 36000 रुपये नुकसानभरपाई , पहा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो! आपल्या राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदतीचा आधार मिळावा म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ३ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

जीरायती पिकांसाठी हेक्टरी ₹१३,६००, बागायती पिकांसाठी हेक्टरी ₹१७,०००, आणि बहुवार्षिक पिकांसाठी ₹३६,००० मदत देण्यात येईल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळपिकांचे खूप नुकसान झाले होते. याबाबत राज्य सरकारने नुकसानीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांनी नुकसानीच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचे ठरवले. याआधी २ हेक्टरपर्यंतच मदत मिळत होती. पण महाविकास आघाडी सरकारने ही मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढवली. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच ही मदत मिळेल आणि त्यांना थोडासा दिलासा मिळेल.

Leave a Comment