लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आज मिळणार जानेवारी-डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये

लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा फायदा मंगळवारपासून सुरू झाला आहे. या योजनेमुळे राज्यातील २ कोटी ३४ लाख बहिणींना आर्थिक मदत मिळणार आहे. पहिल्याच दिवशी ६७ लाख बहिणींच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात आले. उर्वरित बहिणींना पुढील दोन-तीन दिवसांत पैसे मिळतील असे सांगितले आहे.

ही योजना जुलै महिन्यात सुरू झाली होती. राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. काही बहिणींच्या बँक खात्यांशी आधार कार्ड जोडलेले नव्हते, त्यामुळे त्यांना आधी लाभ मिळाला नव्हता. ऑक्टोबर महिन्यात २ कोटी ३४ लाख पात्र बहिणींना प्रत्येकी ७५०० रुपये दिले होते, ज्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे पैसे समाविष्ट होते.

डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी सरकारने १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी घोषणा केली की, खातेवाटप झाल्यानंतर डिसेंबरचा लाभ त्वरित देण्यास सुरुवात झाली आहे.

नवीन पात्र लाभार्थ्यांमध्ये १२ लाख ८७ हजार बहिणींची बँक खाती आधारशी जोडलेली नव्हती. त्यामुळे त्यांना याआधी पैसे मिळाले नव्हते. आता या बहिणींना सहा महिन्यांचे एकूण ९,००० रुपये जमा करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीत फायदेशीर ठरली. या योजनेमुळे अनेक बहिणींनी महायुतीला मतदान केले, ज्यामुळे सरकारला मोठे यश मिळाले.

यादीत नाव पहा

येथे क्लिक करून

Leave a Comment