नमस्कार मित्रांनो! 2024 वर्षात महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली आहे. ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक महिलांना 6 हफ्ते मिळाले आहेत. म्हणजेच त्यांच्या खात्यात एकूण 9000 रुपये जमा झाले आहेत. काही महिलांनी उशिरा अर्ज केला आहे, तर काहींनी अजूनही अर्ज केलेला नाही. परंतु आता या महिलांना अर्ज करण्याची नवीन संधी मिळणार आहे. यासोबतच अर्ज प्रक्रियेबद्दल एक महत्त्वाचे अपडेट आले आहे.
ज्या महिलांनी योजनेचा अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. तसेच, पुढील आर्थिक वर्षात महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी महिलांना थोडी वाट पाहावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजनेची
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याआधी राज्यातील सुमारे 12 लाख महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नव्हते. अशा महिलांना पैसे मिळाले नव्हते. मात्र, ज्या महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे, त्यांना डिसेंबर 2024 मध्ये 9000 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे अजूनही ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असल्याची खात्री करा!