लाडकी बहीण योजना: ladki Bahin Yojana update 2025
मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये थेट जमा केले जातात. आतापर्यंत तब्बल 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा फायदा झाला आहे.
सध्या काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत की, या योजनेत अडथळे येत आहेत किंवा नियम बदलले आहेत. पण सरकारने स्पष्ट केले आहे की, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणताही बदल झालेला नाही. लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी (स्क्रुटिनी) कोणताही नवा निर्णय घेतलेला नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की, मेनिफेस्टोमधील आश्वासन पुढील बजेट अधिवेशनात सादर केले जाईल. महिलांना मिळणारा 1,500 रुपयांचा लाभ नियमितपणे सुरूच राहणार आहे. जर काही तक्रारी आल्या, तर त्यांची योग्य ती चौकशी केली जाईल. मात्र, ही तपासणी सामान्य लाभार्थ्यांसाठी लागू होणार नाही.
सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, लाडकी बहीण योजना अशीच प्रभावीपणे पुढे राबवली जाईल. लाभार्थ्यांची संख्या वाढवायची किंवा कपात करायची याबाबत कोणतीही चर्चा सध्या झालेली नाही.
म्हणून, गैरसमज पसरवू नका. जर भविष्यात काही समस्या आल्या, तर शासन आणि संबंधित विभाग योग्य निर्णय घेतील. ही योजना महिलांच्या हितासाठी सुरू राहील, असे सरकारने सांगितले आहे.